कारंजा येथे खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा संपन्नराष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम

कारंजा येथे खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा संपन्न

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम

वाशिम ,(जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा पंचायत समिती कारंजा येथे नुकतीच संपन्न झाली.

कार्यशाळेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीचे अध्यक्ष वैभव वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस एस परभणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुईकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ किरण जाधव, इंडियन मेडिकल असोसिएशन व नीमा संघटना, कारंजाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरुवात झाली. 

यावेळी डॉ.सतीश परभणकर म्हणाले की, खाजगी डॉक्टरांकडे क्षयरुग्ण निदानाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांनी क्षयरुग्णांची माहिती शासकीय यंत्रनेला कळवणे बंधनकारक आहे. तसेच यांनी राष्टीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत सुधारित मार्गदर्शक सुचनेनुसार सन २०२५ पर्यंत भारत देशातून क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी प्रत्येक क्षयरुग्णांचे निदान करुन उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षयरुग्णांवर उपचार करावे, शासकीय-खाजगी वैद्यकीय यंत्रणा औषधी विक्रेते यांनी जिल्हा क्षयरोग केंद्राशी समन्वय राखावा व प्रत्येक रुग्णावर पूर्ण उपचार होईल याकडे लक्ष द्यावे. नवीन निदान पध्दतीचा वापरामध्ये सिबिनेट व ट्रूनेत मशीनचा वापर करण्यात यावा, असे सांगितले. 

तसेच कुष्ठरोग व क्षयरोगाच्या उपचार पध्दतीची माहीती दिली तसेच निदान कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले, शासकीय योजना व खाजगी डॉक्टरांचा सहभाग व क्षयरुग्ण निदान केल्यास डॉक्टरांना मिळणारे मानधन, निदान व रुग्णांना मिळणारा आहार भत्ता या बाचत माहीती देत क्षयरोगाचे निदान झाल्यास त्याची माहीती शासकीय यंत्रणेस देणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच डॉ. किरण जाधव तालुका वैदयकीय अधिकारी यांती सर्व सुविधा रुग्णांना पुरवीण्यात येतील याबाबत शाश्वती दिली. 

कार्यक्रमाचे संचालन खरतडे यांनी केले. कार्यक्रमास इंडियन मेडिकल असोसिएशन व नीमा संघटना, कारंजा चा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिमचे लोनसुने, सोनुने, गवई,पाटील, चव्हाण, ठाकरे, घुमरे, महाजन तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
००००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश