एनएसएसच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे सात दिवसीय शिबिराचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
एनएसएसच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
सात दिवसीय शिबिराचे आयोजन
वाशिम (जिमाका) : येथील राजस्थान महाविद्यालयाच्या वतीने सावरगाव बर्डे येथे राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आपत्ती व्यवस्थापन आव्हाने व उपाययोजना याविषयावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत होते.प्रमुख अतिथी प्रा. डॉ. शैलेश सोनवने , प्रा. डॉ. धनविजय, प्रा. डॉ. स्वप्नील काळबांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी ताजने व आभार प्रदर्शन अश्विनी खिल्लारे यांनी केले. या कार्यक्रमाला एनएसएसचे विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.
०००
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment