महिला बचत गटाच्या प्रदर्शनीचा समारोप


महिला बचत गटाच्या प्रदर्शनीचा समारोप

वाशिम (जिमाका) : मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला बालविकास विभागाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत लोकसंचालित साधन केंद्र वाशिम यांच्या महिला बचत गट निर्मित वस्तूंची नवतेजस्विनी प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन दि.२० ते २३ फेब्रुवारीपर्यंत विठ्ठलवाडी मंगल कार्यालय वाशिम येथे आयोजित करण्यात आले होते. आज या प्रदर्शनीचा समारोप करण्यात आला.

या समारोपाला सहाय्यक सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी कल्पना लोहकपूरे तसेच आयसीआयसीआयचे विभागीय व्यवस्थापक सुहास बोबडे, मनीष गुल्हाने, रामेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

विभागीय व्यवस्थापक सुहास बोबडे बोलताना म्हणाले की, मागील बारा वर्षांपासून सीएमआरसी व आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून बचत गटांना कर्जपुरवठा होत आहे. त्याची पूर्णपणे कर्ज परतफेड होत आहे. प्रती बचत गटांवा बँकेमार्फत २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहेत. या कर्जामधून महिलांच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध होत आहे. भरपूर महिला ह्या उद्योजक घडल्या आहेत. त्याच धर्तीवर आज महिलांना एमई लोनमार्फत व्यवसाय करण्यासाठी प्रति महिला दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे ते म्हणाले.

या प्रदर्शनीच्या कालावधीत गेल्या चार दिवसापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामधील विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रदर्शनीमध्ये सहभागी बचत गटांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

या प्रदर्शनीच्या माध्यमातून विविध बँक, शासकीय विभागांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. लोकसंचालित साधन केंद्र वाशिमच्या अध्यक्ष जय उचित यांनी सर्व सहभागी बचत गटांचे आभार व्यक्त केले. या समारोप कार्यक्रमाला व्यवस्थापक संगीता शेळके, प्रमोद गोरे, संतोष मुखमाले, लेखापाल सीमा पचपिल्ले, प्रदीप देवकर, विनय पडघान, उपजीविका सल्लागार नंदकिशोर राठोड, अरुण सुर्वे, सह्योहिनी, सीआरपी यांची उपस्थिती होती.
०००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे