वत्सगुल्म कृषी महोत्सवात १२ फेब्रुवारी रोजी संत्रा लागवड, प्रक्रिया उद्योगातील संधीविषयी तज्ज्ञांचे व्याख्यान


वत्सगुल्म कृषी महोत्सवात १२ फेब्रुवारी रोजी संत्रा लागवड, प्रक्रिया उद्योगातील संधीविषयी तज्ज्ञांचे व्याख्यान

वाशिम (जिमाका) : शहरातील बाळासाहेब ठाकरे कृषी संकुल प्रांगण, काटा रोड येथे पाच दिवसीय वस्तगुल्म कृषी महोत्सव व प्रदर्शनीला आजपासून सुरुवात झाली आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांसाठी सोमवारी (दि.१२) संत्रा इंडो इस्त्राईल लागवड तंत्रज्ञान, शेतकरी परिसंवाद, संत्रा प्रक्रिया उद्योगातील संधी व व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत संत्रा इंडो इस्त्राईल लागवड तंत्रज्ञानाविषयी डॅा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे अधिष्ठाता डॅा. डि एम पंचभाई यांचे व्याख्यान व संत्रा उत्पादक शेतकरी परिसंवाद होईल. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत संत्रा प्रक्रियाविषयी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे राहुल घोगरे यांचे व्याख्यान होईल. 

दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत मृग बहार व्यवस्थापन आणि संत्रा प्रक्रिया उद्योगातील संधी व व्यवस्थापनाविषयी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील निवृत्ती पाटील यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या व्याख्यानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश