वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यंत्रणेने पुर्ण करावे - जिल्हाधिकारी मीना



·        ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम
वाशिम, दि. १६ : पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वृक्षांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. बिघडलेल्या पर्यावरणावर मात करावयाची असेल तर वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत ज्या यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे ते त्यांनी पुर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेतांना श्री. मीना बोलत होते. सभेला उपवन संरक्षक सुमंत सोळंके, भारतीय पोलीस सेवेचे परिविक्षाधीन पोलीस अधिकारी पवन बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मीना म्हणाले, जिल्ह्यात वनाच्छादीत भाग कमी आहे. वृक्ष लागवड मोहिमेमुळे वृक्षांची मोठया प्रमाणात लागवड करुन त्यांचे संवर्धन करता येईल. त्यामुळे मोठा भाग वृक्ष लागवडीखाली आणण्यास मदत होईल. यंत्रणांनी आपल्याला दिलेले उद्दिष्ट पुर्ण करतांना सुक्ष्म नियोजन करावे. असे त्यांनी सांगितले.
            सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्हयाला ४३ लक्ष ३ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वन विभागाला १० लक्ष २० हजार, सामाजिक वनीकरण विभागाला १० लक्ष, ग्रामपंचायतींना १५ लक्ष ७१ हजार ७००, कृषी विभागाला २ लक्ष १७ हजार ५००, नगर पालिका क्षेत्रात ३४ हजार ८५०, जलसंपदा विभागाला २४ हजार ८०० आणि इतर सर्व विभागाला ४ लाख ३४ हजार ६५० असे एकूण ४३ लाख ३ हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अशोक वायाळ यांनी यावेळी दिली.
सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एन. राठोड, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक सुनंदा बजाज, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, वाशिम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे