‘वाट समतेची...’ घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
·
जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती
वाशिम, दि. २६ :
समाजिक न्याय विभागाच्या योजनांची
माहिती लाभार्थ्यांना व्हावी व त्यामाध्यमातून त्या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा,
यासाठी वाशिम जिल्हा माहिती कार्यालयाने सन २०१८-१९ या वर्षात अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत
तयार केलेल्या ‘वाट समतेची...’ या घडीपुस्तिकेचे विमोचन पोलीस कवायत मैदान येथे
आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री संजय राठोड यांच्या
हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना,
प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा
माहिती अधिकारी विवेक खडसे, माहिती सहाय्यक तानाजी घोलप उपस्थित होते.
‘वाट समतेची...’ या घडीपुस्तिकेमध्ये समाज कल्याण
विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये भारत सरकार मॅट्रीकोत्तर
शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार
प्रतिबंधक कायदा, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती
व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित
जाती व नवबौध्द मुलामुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी पब्लिक स्कूल,
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन
योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, सावित्रीबाई फुले
शिष्यवृत्ती योजना या योजनांच्या प्रमुख अटी, लाभाचे स्वरूप, अर्ज करण्याची पद्धत
व कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधावा, याबाबतची माहिती समाविष्ट आहे. या
घडीपुस्तिकेतील माहितीच्या आधारे संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
घेणे सोयीचे होणार आहे.
Comments
Post a Comment