विद्युत सुरक्षा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
·
शाळा, महाविद्यालयांतही
होणार जनजागृती
वाशिम, दि. १० :
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत
११ ते १७ जानेवारी २०१९ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त
विद्युत निरीक्षण विभागाच्या वाशिम विद्युत निरीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यात
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहामध्ये
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जावून विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेविषयी
माहिती देण्यात येणार आहे. तसेच १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता विद्युत भवन येथे
महावितरणच्या यंत्रचालक व तंत्रज्ञ यांच्याकरिता विद्युत सुरक्षेविषयी कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान जिल्ह्यात चित्ररथाद्वारे सुद्धा जनजागृती
करण्यात येणार असून ११ जानेवारी रोजी या मोहिमेचा शुभारंभ होईल. हा चित्ररथ
ग्रामीण भागात जावून विजेच्या सुरक्षित वापराविषयी माहिती देईल. तसेच यावेळी
सुरक्षा माहिती साहित्याचे वितरणही करण्यात येईल.
विद्युत
सप्ताहानिमित्त सर्वसामान्य नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती
करण्यासाठी १७ जानेवारी २०१९ रोजी वाशिम शहरातील प्रमुख मार्गांवर रॅलीचे आयोजन
करण्यात येणार आहे. यामध्ये विद्युत निरीक्षक विभागातील अभियंते, महावितरणचे
अधिकारी, कर्मचारी तसेच तंत्र निकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी
उपस्थित राहणार आहेत, असे वाशिम विद्युत निरीक्षक कार्यालयाच्यावतीने कळविण्यात
आले आहे.
Comments
Post a Comment