जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली



वाशिम, दि. ०७ :   जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्रलंबित असलेल्या २२ तक्रारींवर सुनावणी घेवून यापैकी १६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. ८ नवीन तक्रारी या लोकशाही दिनात दाखल झाल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम वानखेडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, अभिषेक देशमुख यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे. लोकशाही दिनात प्राप्त झालेले तक्रार अर्जावर त्वरित कार्यवाही करून त्याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे