दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
वाशिम, दि. 07 : जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे आज 7 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषेदेचे
अध्यक्षा हर्षदा देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी प्रमोद काकडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव जाधव यांची
प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
क्रीडा स्पर्धेला
संस्थाचालक चंद्रकांत देवळे, गजानन कोरडे, पुंडलिक राठोड यांचेसह सहायक सल्लागार शालिकराम
पुंड, समाजकल्याण निरीक्षक श्री. वाघ, अनसिंग
येथील मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन कोल्हे, पोहरादेवी
मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन आवटिक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रारंभी
दिव्यांग विद्यार्थ्यांनी “कानाने बहिरा, मुका परि नाही”
हे गीत सादर करुन उपस्थितांची प्रशंसा मिळविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले. उपस्थितांचे आभार शालिकराम फुंडे
यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हयातील दिव्यांग शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment