पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे विमोचन
वाशिम, दि. १६ : माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या जानेवारी महिन्यातील
‘खेलो इंडिया’ विशेषांकाचे विमोचन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज शासकीय
विश्रामगृह येथे करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि. प. सदस्य विकास
गवळी, दिलीप देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी
नितीन मोहुर्ले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.
खेलो इंडिया युथ गेम्सनिमित्त हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला असून
यामध्ये महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील क्रीडा संस्कृती, खेलो इंडियासाठी
महाराष्ट्राने केलेली तयारी याची माहिती देण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षीच्या खेलो इंडियातील
महाराष्ट्राची कामगिरीचा आढावा, जगज्जेत्या क्रीडापटूंचे अनुभव, राज्य व केंद्र
शासनाच्या क्रीडा क्षेत्रासाठी असणाऱ्या विविध योजना आदी विविध विषयांचा समावेश या
विशेषांकात आहे. खेळाडू, शिक्षक, पालक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक
यांच्यासाठी हा अंक उपयुक्त व प्रेरणादायी आहे. जिल्ह्यातील प्रमुख बुक स्टॉलवर हा
अंक उपलब्ध असून याची किंमत केवळ दहा रुपये आहे.
Comments
Post a Comment