दीपक कुमार मीना यांची वढवी गावाला भेट


मुक्कामातून ग्रामस्थांशी संवाद


वाशिम, दि. २४ : प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी नुकतीच कारंजा तालुक्यातील महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झालेल्या वढवी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तहसीलदार रणजीत भोसले, अभियानाचे जिल्हा समन्वयक वासू ढोणे, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह तालुका यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या नामफलकाचे उद्घाटन श्री. मीना यांनी केले. गावातील भजनी मंडळाने त्यांचे स्वागत केले. तसेच गावातील विद्यार्थ्यांनी यादिवशी गावफेरी काढली. यावेळी श्री. मीना यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केले. अभियानाच्या निर्देशांकानुसार गावात सुरु असलेल्या कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या लवकरच निकाली काढणार असल्याचे ग्रामस्थांना त्यांनी आश्वस्त केले. अभियानाअंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. गावात अभियाना अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाबाबतची माहिती ग्राम परिवर्तक अमोल पाचडे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे