निर्यात क्षेत्रातील संधीबाबत संमेलनातून तज्ञांनी केले मार्गदर्शन
निर्यात क्षेत्रातील संधीबाबत संमेलनातून तज्ञांनी केले मार्गदर्शन वाशिम, दि. 30 (जिमाका) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उद्योग संचालनालय व सिडबी उद्योजकता विकास केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने नुकतेच विधाता प्रशिक्षण केंद्र, वाशिम येथे निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात निर्यातदार व निर्यात क्षेत्राशी संबंधित तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निर्यात क्षेत्रातील संधीचा लाभ घेवून जिल्हयातील उद्योजक, व्यावसायीक, शेतकरी व उत्पादक कंपनी यांनी आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संमेलनाचे उदघाटन सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.डी. खंबायत, उद्योग निरीक्षक के.ए. शेख, केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाचे नागपूर येथील सहायक संचालक डॉ. मनिष मोंढे, वाशिमचे कृषी विभागाचे उपसंचालक निलेश ठोंबरे, भारतीय स्टेट बँकेचे मुख्य अधिकारी ...