पोलीस कवायत मैदान येथेमहाराष्ट्र दिनाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरामुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते ध्वजारोहण
पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते ध्वजारोहण वाशिम दि.०१ मे (जिमाका) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे उत्साहात संपन्न झाला.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह,सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम.अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले,राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अभिनव बालुरे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विजय काळबांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले.श्रीमती पंत यांनी परेडचे निरीक्षण केले.वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक,गृहरक्षक दलाचे पुरुष व महिला पथक,पोलीस बँण्ड पथक दल आदी परेडमध्ये सहभागी झाले होते. परेडमध्ये सहभागी पथकांनी रा...