वाहतुक नियमबाबत जनजागृती :विधी सेवा प्राधिकरणचा पुढाकार
वाहतुक नियमबाबत जनजागृती विधी सेवा प्राधिकरणचा पुढाकार वाशिम दि.30(जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिमच्या वतीने नागरिकांना वाहतुकींच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी आज 30 ऑगस्ट रोजी वाशिम शहरातील बसस्थानक परिसर,बसस्थानक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पाटणी चौकात जनजागृती करण्यात आली.ही जनजागृती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विजय टेकवाणी यांच्या मार्गदर्शनात विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी, शाहीर उत्तम इंगोले,मनीषा दाभाडे व शीतल बन्सोड यांनी केली.शाहीर उत्तम इंगोले यांनी जनजागृतीपर गीत गायन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना विधी स्वयंसेवकांनी हस्तपत्रके वितरित करून वाहतूक नियमांबाबतची माहिती दिली.