पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत आता १ ऑगस्टपर्यंत
पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत आता १ ऑगस्टपर्यंत वाशिम दि.३० (जिमाका) प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२२ -२३ च्या खरीप हंगामात विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंतचा कालावधी निश्चित केला होता.परंतु ३१ जुलै रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस येत असल्याने केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत व एका पत्रात नमूद केल्याप्रमाणे आता प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत आता १ ऑगस्ट २०२२ अशी निश्चित केली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन या योजनेत सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.