ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता -षण्मुगराजन एस. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर
ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता -षण्मुगराजन एस. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर वाशिम, दि. 31 (जिमाका) : आज विविध क्षेत्रात करीअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे. शिक्षण घेत असतांनाच आपल्याला कोणत्या क्षेत्रात करीअर करायचे आहे हे आधी निश्चित करावे. आपण निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी युवा वर्गाने कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले. वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालयात आज कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय श...