राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानमोफत मिळणार कोर्सचे प्रशिक्षण उमेदवारांकडून अर्ज मागविले
राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान मोफत मिळणार कोर्सचे प्रशिक्षण उमेदवारांकडून अर्ज मागविले वाशिम, दि. 28 (जिमाका) : दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, नगर परिषद, वाशिमअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. हे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत प्रशिक्षण पुर्णत्वाचे प्रमाणपत्र, प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी, संबंधित कौशल्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर रोजगार/स्वयंरोजगार वैयक्तिक व्यवसायासाठी बँकेमार्फत अर्थसहाय्याचा लाभ वाशिम शहरातील उमेदवारांना देण्यात येणार आहे. वाशिम येथील श्री. गणेशा टेक्नॉलाजी, जाधव ले-आऊट, लाखाळा, वाशिम येथे 60 क्षमतेच्या अकाऊंट एक्झीकिटिव्ह कोर्ससाठी प्रवेश देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 3 महिन्याचा असून शैक्षणिक पात्रता इ. 12 वी पास निश्चित केली आहे. याच प्रशिक्षण संस्थेत एलईडी लाईट रिपेअर टेक्निशियन प्रशिक्षणाकरीता 60 उ...