जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा वाशिम दि.२८(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जल जीवन मिशन कार्यक्रमाचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उपवनसंरक्षक श्री मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुभाष कोरे, पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व्ही.आर.वेले आणि जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना श्री. षण्मुगराजन यांनी जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणारी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावी अशा सूचना दिल्या. तसेच मिशनची कामे सध्या कोणत्या टप्प्यात आहेत, पाण्याचे स्रोत कोणते आहेत,तसेच रेट्रो फ़िटिंगच्या कामाच्या प्रगतीची व प्रलंबित नळजोडण्याची माहिती देखील यावेळी घेतली. जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ चा प्रस्तावित आराखडा...