सामाजिक न्याय पर्वानिमित्त अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा यावर कार्यशाळा संपन्न
सामाजिक न्याय पर्वानिमित्त अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा यावर कार्यशाळा संपन्न वाशिम, दि. 30 (जिमाका) : 6 डिसेंबरपर्यंत सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज 30 नोव्हेंबर रोजी समाज कल्याण, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वाशिम यांच्या संयुक्तवतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे अनुसूचित जाती उत्थान, दशा आणि दिशा या विषयावर अनुसूचित जातीच्या घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग यांची कार्यशाळा संपन्न झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले. अनुदानित वसतीगृह व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून वसतीगृहातील विद्यार्थ्...