Posts

प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         वाशिम येथे २८ व्या रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ ·         वाहतूक नियमांविषयी होणार जनजागृती ·         सलग पंधरा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन वाशिम , दि . ०९ : देशामध्ये सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातामध्ये होतात. रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने वाहन चालविताना अथवा रस्त्यावरून चालताना वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड, रस्ता सुरक्षा समितीचे अशासकीय सदस्य डॉ. हरिष बाहेती आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान व वाहतूक नियमांविषयी माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकांचे विमोचन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, देशात रस्ते अपघातामुळे सुमारे सव्वा दोन लाखापेक्ष...

माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा मेळावा ·         ध्वजदिन निधी संकलनबद्दल सीईओ पाटील यांचा सत्कार वाशिम , दि . ३० :   देशाची सेवा करून परत आलेल्या माजी सैनिकांना सर्वसामान्य नागरी जीवनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज नियोजित सैनिक संकुलाच्या जागेवर आयोजित जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा यांच्या मेळाव्यात सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल आर. आर. जाधव, सैन्यामध्ये कर्नल पदापर्यंत पोहचून निवृत्त झालेले वाशिम जिल्ह्यातील निवृत्त कर्नल प्रवीण ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम दीपप्रज्ज्वलन व शहीद स्मारक स्मृती चिन्हाला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात झाली. ध्वजदिन निधी संकलनात जिल्हा परिषदेने १२५ टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांचा यावेळी शहीद स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसे...

‘डिजिटल पेमेंट’च्या पर्यायाचा अवलंब करण्याची गरज

Image
·         रोखरहित व्यवहाराचे अनेक मार्ग उपलब्ध ·        ‘मोबाईल बँकिंग’साठी स्मार्टफोनची गरज नाही ·        विविध कार्ड्स, स्मार्टफोनच्या सहाय्याने व्यवहार शक्य देशातील काळा पैसा व भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी सर्वांनी ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना नुकतेच केले आहे. काळा पैसा व भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी ‘डिजिटल पेमेंट’ ही संकल्पना फायदेशीर ठरणारी आहे. तसेच ‘डिजिटल पेमेंट’चे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने व ही संकल्पना अतिशय सोपी असल्याने सर्वसामन्य नागरिकांनाही याचा वापर करणे सहज शक्य होणार आहे. बँकांमार्फत देण्यात येणारे विविध कार्ड, मोबाईल बँकिंग, एईपीएस, मिक्रो एटीएम, युपीआय, वॉलेटस, पीओएस प्रणालीद्वारे रोखरहित व्यवहार करून ‘डिजिटल पेमेंट’चा पर्याय सर्वांना वापरता येणे शक्य आहे. या सर्व पर्यायांचा वापर कसा करता येईल, याची माहिती पुढील प्रमाणे आहे. बँक कार्ड्स- बँकेमार्फत ग्राहकांना प्रीपेड कार्ड, ड...

स्पर्धात्मक परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा पुढाकार

Image
·         जवाहर नवोदय विद्यालयात घेतला वर्ग ·         विद्यार्थ्यांना ‘जेईई’ पूर्व तयारीबाबत मार्गदर्शन वाशिम , दि . २६ –   ग्रामीण भागातून येऊन जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही ‘जेईई’सारख्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करावे, याकरिता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी हे स्वतः आयआयटीचे विद्यार्थी असल्याने जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शनाचा लाभदायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्यालयीन कामकाजातून वेळ मिळेल तेव्हा, शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी द्विवेदी हे जवाहर नवोदय विद्यालयातील १२ वीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ‘जेईई’सारख्या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी काय तयारी केली पाहिजे, हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजावे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. स्वतः जिल्हाधिकारी शिक्षक बनून मार्गदर्शन करत असल्याने तसेच विद्यार्थ्यांशी संवाद सा...

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक वाचन

Image
वाशिम , दि . २५ –   दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, श्री. डाखोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, अधीक्षक श्री. गिरी, विधी अधिकारी महेश महामुने, जिल्हा सूचना व व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.