पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा ‘लोकसंवाद’


🌺 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा ‘लोकसंवाद’ 🌺

📍 वाशिम, दि. २४ सप्टेंबर (जिमाका)

गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची थेट माहिती देण्यात येत आहे.

📌 आज, दि. २४ सप्टेंबर रोजी वाशिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील ‘गजानन मित्र मंडळ गणेशोत्सव मंडळा’च्या प्रांगणात सहकार विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी सहकार अधिकारी श्रेणी-२ गणेश कुकडे व सहाय्यक सहकार अधिकारी अनिल सावंत यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. योजनेचा मुख्य उद्देश, पात्र लाभार्थी तसेच लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करून योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.

🙏 गणेशोत्सवाच्या लोकव्यासपीठाचा सकारात्मक वापर करून नागरिकांना थेट शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमाला महिला व नागरिकांची उपस्थिती होती.

#लोकसंवाद२०२६ #गणेशोत्सव #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना #सहकारविभाग #जनजागृती #शासकीययोजना #वाशिम

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर