लोकसंवाद उपक्रम २०२६नवभारत गणेशोत्सव मंडळात महाकुंभ रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची दिली माहिती
लोकसंवाद उपक्रम २०२६
नवभारत गणेशोत्सव मंडळात महाकुंभ रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची दिली माहिती
वाशिम, दि. १८ सप्टेंबर (जिमाका) : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता नवभारत गणेशोत्सव मंडळ, पाटणी चौक, वाशिम येथे कौशल्य विकास विभागाचे संजय उगले यांनी जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी दहा ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या महाकुंभ रोजगार मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सखोल माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी महाकुंभ रोजगार मेळाव्यातील रोजगाराच्या उपलब्ध संधी, मेळाव्यात सहभागी होण्याची प्रक्रिया तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत रोजगार व कौशल्यविकासाशी संबंधित शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळत असून, त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळत आहे.
Comments
Post a Comment