महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ


महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२६ पासून गणेशोत्सव ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव - महागणेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली.

या स्पर्धेसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीhttps://ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. राज्यभरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.

#गणेशोत्सव२०२६ #महागणेशोत्सव #राज्यउत्सव #कोकण #महाराष्ट्रशासन #Ganeshotsav #Ganeshotsav2026

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर