प्रवासी वाहतूक चालकांसाठी आनंदाची बातमीपासष्टी पूर्ण केलेल्यांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी


प्रवासी वाहतूक चालकांसाठी आनंदाची बातमी

पासष्टी पूर्ण केलेल्यांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

ऑनलाईन सभासद नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम, दि. ९ सप्टेंबर (जिमाका) : राज्यातील प्रवासी वाहतूक चालकांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या वतीने वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र सभासदांना १० हजार रुपये सन्मान निधी देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ मे २०२६ पर्यंत मंडळाकडे नोंदणी केलेले आणि १ सप्टेंबर २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेले पात्र चालक सभासद असणे आवश्यक आहे. पात्र सभासदांना प्रत्येकी १० हजार रुपये, असा सन्मान निधी देण्यात येणार आहे.

ऑनलाईन सभासद नोंदणी करा

वाशिम जिल्ह्यातील पात्र प्रवासी वाहतूक चालकांनी (https://www.ananddighekalyankarimandal.org)
या संकेतस्थळावर ऑनलाइन सभासद नोंदणी करावी.

तसेच लाभ मिळण्यासाठी आपल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराकडे प्रवासी वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती, बॅज, पॅनकार्ड, रेशनकार्ड आदी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

प्रवासी वाहतूक चालकांनी मोठ्या संख्येने सभासद होऊन मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

#प्रवासीवाहतूकचालक #सन्माननिधी #चालककल्याण #आनंददिघे #कल्याणकारीयोजना #ऑनलाईनसभासदनोंदणी #परिवहन #वाशिम

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर