⚖️ राष्ट्रीय लोक अदालतीत ५९४ प्रकरणे निकाली💰 १९ कोटी ७० लाखांहून अधिक रकमेची तडजोड
⚖️ राष्ट्रीय लोक अदालतीत ५९४ प्रकरणे निकाली
💰 १९ कोटी ७० लाखांहून अधिक रकमेची तडजोड
वाशिम, दि. १३ सप्टेंबर (जिमाका) :
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार १२ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या लोक अदालतीत एकाच दिवसात ५९४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून एकूण १९ कोटी ७० लाख ५० हजार ७११ रुपयांच्या रकमेची तडजोड झाली आहे.
सदर लोक अदालतीचे उद्घाटन उपस्थित पक्षकारांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. एस. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोक अदालतीदरम्यान मोटार अपघात दावा प्रकरण क्र. ४०/२०२२ हा तडजोडीने निकाली काढून न्यायमूर्तींच्या हस्ते संबंधित पक्षकारास ९५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच उच्च न्यायालयाने विहित मुदतीत निकाली काढण्याचे आदेश दिलेले दोन दिवाणी दावे तडजोडीने पूर्ण झाल्याने, त्या दाव्यांचा लोक अदालतीचा ‘निवाडा’ न्यायमूर्तींच्या हस्ते पक्षकारांना प्रदान करण्यात आला.
📊 राष्ट्रीय लोक अदालतीची प्रमुख आकडेवारी
▪️ एकूण विचारार्थ प्रकरणे : प्रलंबित ४ हजार ६२० आणि दाखलपूर्व ६ हजार ४८८
▪️ निकाली काढलेली प्रकरणे : ५१९ प्रलंबित आणि ७५ दाखलपूर्व — एकूण ५९४ प्रकरणे
▪️ एकूण तडजोड रक्कम : १९ कोटी ७० लाख ५० हजार ७११ रुपये
(एकूण १९ कोटी सत्तर लाख पन्नास हजार सातशे अकरा रुपये)
ही राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वाशिम जिल्हा वकील संघ तसेच जिल्हा पोलीस दलाचे मोलाचे सहकार्य लाभले.
#राष्ट्रीयलोकअदालत #लोकअदालत #वाशिम #विधीसेवा #न्यायव्यवस्था #न्याय #महाराष्ट्रराज्यविधीसेवाप्राधिकरण #राष्ट्रीयविधीसेवाप्राधिकरण
Comments
Post a Comment