लोकसंवाद-२०२६ व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अंतर्गत पांगरी नवघरे येथे बालकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिरगजानन चिल्ड्रेन हॉस्पिटलच्या वतीने आयोजन५० नागरिकांना मोफत आयुष्मान कार्ड
🏥🌺 लोकसंवाद-२०२६ व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अंतर्गत पांगरी नवघरे येथे बालकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
गजानन चिल्ड्रेन हॉस्पिटलच्या वतीने आयोजन
५० नागरिकांना मोफत आयुष्मान कार्ड
📍 वाशिम, दि. २५ सप्टेंबर (जिमाका) : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत नवयुवक गणेश उत्सव मंडळ, पांगरी नवघरे येथे नागरिकांना आयुष्मान भारत आरोग्य योजनेची माहिती देण्यात आली. गजानन चिल्ड्रेन हॉस्पिटल, वाशिम यांच्या वतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
👧👦 या शिबिरात बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ५० नागरिकांचे मोफत आयुष्मान कार्ड काढण्यात आले.
👥 शिबिरासाठी आयुष्मान भारत आरोग्य योजनेच्या अंमलबजावणी सहाय्य संस्थेचे जिल्हा प्रमुख वैभव टकले, आरोग्य मित्र अक्षय देशमुख, गजानन चिल्ड्रेन हॉस्पिटलच्या वतीने डॉ. वैष्णवी काळे, विनोद ठाकरे, जगदीश महाले आणि अश्विनी भगत उपस्थित होते.
#लोकसंवाद२०२६ #श्रीगणेशाआरोग्याचा #आरोग्यशिबिर #मोफतआरोग्यतपासणी #आयुष्मानभारत #आयुष्मानकार्ड #गणेशोत्सव #पांगरीनवघरे #वाशिम #जिल्हामाहितीकार्यालयवाशिम
Comments
Post a Comment