लोकसंवाद व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ संयुक्त उपक्रम🩺 रिसोड येथील रामभरोसे गणेश मंडळात १२५ नागरिकांची आरोग्य तपासणी💳 २० नवीन आयुष्मान कार्ड


🌺🏥 लोकसंवाद व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ संयुक्त उपक्रम

🩺 रिसोड येथील रामभरोसे गणेश मंडळात १२५ नागरिकांची आरोग्य तपासणी

💳 २० नवीन आयुष्मान कार्ड

📍 वाशिम, दि. २५ सप्टेंबर (जिमाका) : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय, रिसोड यांच्या वतीने रामभरोसे गणेश मंडळ, इंदिरानगर येथे २२ सप्टेंबर रोजी तपासणी व औषधवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

🩺 शिबिरात रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, हृदयरोग, वयोवृद्धांचे आजार, रक्तक्षय तसेच इतर सामान्य आजारांची तपासणी करण्यात आली. सुमारे १२५ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी २० नवीन आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले. तसेच नागरिकांना आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यात आली.

🙏 शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रामभरोसे गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.

#लोकसंवाद२०२६ #श्रीगणेशाआरोग्याचा #आरोग्यशिबिर #आरोग्यतपासणी #आयुष्मानभारत #आयुष्मानकार्ड #गणेशोत्सव #रिसोड #वाशिम #जिल्हामाहितीकार्यालयवाशिम

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर