सेवा संकल्प अभियानातून गणेशपुरात स्वच्छता, वृक्षारोपण आणि महिला सक्षमीकरणाला चालना


सेवा संकल्प अभियानातून गणेशपुरात स्वच्छता, वृक्षारोपण आणि महिला सक्षमीकरणाला चालना 

वाशिम, दि. २४ सप्टेंबर (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाच्या अनुषंगाने रिसोड तालुक्यातील गणेशपुर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी भेट देऊन स्वयंसहायता गटातील महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी गावात वृक्षारोपण आणि श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ग्रामसंघाच्या माध्यमातून दोन स्वयंसहायता गटांना प्रत्येकी ६० हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान यांनी गावातील उमेद अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. तसेच अभियानात समाविष्ट न झालेली उर्वरित २५ कुटुंबे अभियानात समाविष्ट करून घेण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक श्री. खुळे, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच तसेच स्वयंसहायता गटातील महिला उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर