आरोग्याचा श्रीगणेशा’ अंतर्गत रिसोडमध्ये आरोग्य तपासणी शिबिर🩺 १५० नागरिकांची तपासणी💳 लोकसंवाद अंतर्गत आयुष्मान भारतसह विविध आरोग्य योजनांची माहिती


🏥🌺 ‘आरोग्याचा श्रीगणेशा’ अंतर्गत रिसोडमध्ये आरोग्य तपासणी शिबिर

🩺 १५० नागरिकांची तपासणी

💳 लोकसंवाद अंतर्गत आयुष्मान भारतसह विविध आरोग्य योजनांची माहिती

📍 वाशिम, दि. २५ सप्टेंबर (जिमाका) : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत व ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ मोहिमेतून महात्मा फुले गणेश मंडळ, रिसोड येथे ग्रामीण रुग्णालय, रिसोड यांच्या वतीने नुकतेच आरोग्य तपासणी व औषधवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना विविध आरोग्य योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

🩺 शिबिरात रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, हृदयरोग, वयोवृद्धांचे आजार, रक्तक्षय तसेच इतर सामान्य आजारांची तपासणी करण्यात आली. सुमारे १५० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला, तर २० नवीन आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले. नागरिकांना आरोग्य योजनांचा लाभ घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

🙏 शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा फुले गणेश मंडळाचे पदाधिकारी डॉ. विशाल इरतकर, मंडळाचे सर्व सदस्य आणि श्री. रामभाऊ देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

#आरोग्याचा_श्रीगणेशा #लोकसंवाद२०२६ #आरोग्यतपासणी #आरोग्यशिबिर #आयुष्मानभारत #आयुष्मानकार्ड #आरोग्ययोजना #गणेशोत्सव #रिसोड #वाशिम #जिल्हामाहितीकार्यालयवाशिम

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर