वाशिमच्या गणेशोत्सवात महिला-बालविकास योजनांचा ‘लोकसंवाद’ 🌺
🌺 वाशिमच्या गणेशोत्सवात महिला-बालविकास योजनांचा ‘लोकसंवाद’ 🌺
📍 वाशिम, दि. २४ सप्टेंबर (जिमाका)
गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांची थेट माहिती देण्यात येत आहे.
📌 आज दि. २४ सप्टेंबर रोजी वाशिम येथील सिव्हिल लाईन परिसरातील ‘वक्रतुंड गणेशोत्सव मंडळा’च्या प्रांगणात महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
👩👧👦 यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी महिला व बालकांच्या सक्षमीकरण आणि संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या सखी वन स्टॉप सेंटर व मिशन शक्ती, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पोषण अभियान तसेच चाईल्ड हेल्पलाईन या प्रमुख योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
या योजनांचा मुख्य उद्देश, पात्र लाभार्थी तसेच लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करून योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
🙏 वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिला व नागरिकांची उपस्थिती होती. गणेशोत्सवाच्या लोकव्यासपीठाचा सकारात्मक वापर करून नागरिकांना थेट शासकीय योजनांची माहिती देण्याच्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
#लोकसंवाद२०२६ #गणेशोत्सव #महिलाबालविकास #मिशनशक्ती #सखीवनस्टॉपसेंटर #बेटीबचाओबेटीपढाओ #पोषणअभियान #ChildHelpline #जनजागृती #शासकीययोजना #वाशिम
Comments
Post a Comment