Posts

स्पर्धात्मक परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा पुढाकार

Image
·         जवाहर नवोदय विद्यालयात घेतला वर्ग ·         विद्यार्थ्यांना ‘जेईई’ पूर्व तयारीबाबत मार्गदर्शन वाशिम , दि . २६ –   ग्रामीण भागातून येऊन जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही ‘जेईई’सारख्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करावे, याकरिता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी हे स्वतः आयआयटीचे विद्यार्थी असल्याने जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शनाचा लाभदायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्यालयीन कामकाजातून वेळ मिळेल तेव्हा, शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी द्विवेदी हे जवाहर नवोदय विद्यालयातील १२ वीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ‘जेईई’सारख्या स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी काय तयारी केली पाहिजे, हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजावे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. स्वतः जिल्हाधिकारी शिक्षक बनून मार्गदर्शन करत असल्याने तसेच विद्यार्थ्यांशी संवाद सा...

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक वाचन

Image
वाशिम , दि . २५ –   दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, श्री. डाखोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, अधीक्षक श्री. गिरी, विधी अधिकारी महेश महामुने, जिल्हा सूचना व व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डाव्या हाताच्या बोटास शाई असल्यास मतदानाकरिता तहसीलदारांची परवानगी आवश्यक - विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता

Image
·         दिनांक २६ नोव्हेंबरपर्यंत घेता येईल परवानगी ·         उजव्या हातास शाई असल्यास परवानगीची गरज नाही वाशिम , दि . २२ : जुन्या पाचशे रुपये व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून देत असताना जिल्ह्यातील काही बँकांमध्ये ग्राहकांच्या बोटांना शाई लावण्यात आली आहे. यामध्ये नजरचुकीने डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली गेली असल्यास अशा व्यक्तीला नगरपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तहसीलदारांचे ना हरकत अथवा परवानगी पत्र घेणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नगरपरिषद निवडणूक आढावा बैठकीत सांगितले. याप्रसंगी जिल्हा निवणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व इतर संबंधित विभ...

खादी कपड्यांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करा - विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता

Image
·         जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दालन सुरु ·         गुरुवारपर्यंत खादी वस्त्र खरेदीची संधी वाशिम , दि . 22 : खादी कपडे तयार करणाऱ्या कारागिरांना रोजगार मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी कापडांचा सर्वांनी वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार खादी कपड्यांची खरेदी करून खादीचा वापर वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे अमरावतीचे विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरु करण्यात आलेल्या खादी वस्त्र विक्री दालनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, भूसंपादन अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. पी. वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विभाग...

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित

Image
·         आता जिल्हास्तरावर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र वाशिम , दि . २१ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरु झाले. समिती कार्यालयाचे उदघाटन समितीचे अध्यक्ष आय. एम. तिटकारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त तथा समितीचे सदस्य बी. डी. खंडाते, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा समितीच्या सदस्य सचिव माया केदार, विशेष निरीक्षक श्री. मुसळे आदी उपस्थित होते. श्री. तिटकारे यांच्या हस्ते फीत कापून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन झाले. याप्रसंगी श्री. तिटकारे म्हणाले, लोकांच्या सोयीसाठी जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आजपासून वाशिम जिल्ह्यात ही समिती कार्यान्वयित झाली असून समितीचे दैनदिन कामकाज आता वाशिममध्य...