Posts

पदवीधर मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

वाशिम , दि . २२ :   भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. दिनांक १ ऑक्टोंबर २०१६ रोजी जाहीर सुचना प्रसिद्ध करून या कार्यक्रमास प्रारंभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दिनांक १ ऑक्टोंबर २०१६ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध होईल. दिनांक १५ ऑक्टोंबर २०१६ रोजी वर्तमानपत्रातील नोटिसीची पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. त्यानंतर दिनांक २५ ऑक्टोंबर २०१६ रोजी वर्तमानपत्रातील नोटिसीची द्विव्तीय पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत नमुना १८ द्वारे दावे व हरकती स्वीकारल्या जातील. दिनांक १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार यादीची छपाई करण्यात येईल. दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याविषयी दावे व हरकती दिनांक २३ नोव्हेंबर ते ०८ डिसेंबर २०१६ या कालावधीत स्वीकारल्या जातील. दावे व हरकती निकाली काढून दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजी पर्यंत  पुरवणी यादी तयार करून छपाई करण्यात येईल. दिनांक ३० डिसें...

जिल्हा वार्षिक योजनेतील निधी खर्चाचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आढावा

Image
·         निधी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ·         विशेष घटक योजनेच्या निधीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना वाशिम , दि . २१ :   जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ अंतर्गत झालेल्या निधी खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी विकास योजना अंतर्गत प्राप्त निधी व खर्च झालेल्या निधीचा यंत्रणानिहाय आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्पच्या अधिकारी श्रीमती वनिता सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यो...

जवाहर नवोदय विद्यालयात ‘डिजिटल क्लास रूम’चे उदघाटन

Image
वाशिम , दि . १७ :   येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या चार डिजिटल क्लास रूम व सीसीटीव्ही यंत्रणेचे उदघाटन खासदार भावना गवळी व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार भावना गवळी यांच्या खासदार निधीमधून डिजिटल क्लास रूम व सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी विद्यालय सल्लागार समिती व विद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलनकुमार संचेती, शिक्षक-पालक समितीचे सदस्य उध्दव काळे व श्रीमती जयश्री सुतवणे उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून होत आहे. या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरिता जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. आज डिजिटल क्लास रूम संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान उपलब्ध होत असून जवाहर नवोदय विद...

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा आढावा

·         दुर्गा उत्सवात जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश वाशिम , दि . १७ :   ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींचे संगोपन व त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजगृती मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. याकारिता आगामी दुर्गा उत्सव काळात विविध माध्यमांचा वापर करून प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याकरिता स्त्रीभ्रूण हत्याविरोधी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहेच, पण त्यासोबत मुलींच्या जन्माविषयी लोकांच्या मानसिकतेमध्ये सुध्दा बदल होणे आवश्यक आहे. याकरिता जाहिरात फलक, पोस्टर्स यासह लोककलांच्या माध्यमातून जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच यामाध्यमातून लोकांना स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायदा, मुलींना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती याविषयी माहिती देण्याच्या ...

'चाइल्ड लाइन'च्या मदतीने सापडला परराज्यात हरविलेला मुलगा!

वाशिम , दि . १७ :  तालुक्यातील सुकळी येथील ११ वर्षीय मुलगा (बालसंरक्षण कायद्यातील तरतुदीमुळे बालकाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.) वडिलांसोबत रेल्वेने प्रवास करीत असताना थेट छत्तीसगड राज्यातील दुर्ग या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशनवर पोहोचला. दरम्यान , या मुलाला वाशिम जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने व दुर्ग जिल्ह्यातील ' चाइल्ड लाइन ' च्या मदतीने वाशिम येथे सुखरूप आणण्यात येऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.   यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले , की हरविलेला ११ वर्षीय मुलगा दुर्ग रेल्वे स्टेशनवर पोहोचला , तेव्हा तेथे तैनात रेल्वे पोलिसांनी त्याची विचारपूस करून त्याला केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या ' चाइल्ड लाइन ' संस्थेच्या दुर्ग येथील अधिकार्‍यांच्या ताब्यात दिले. दुर्ग येथील ' चाइल्ड लाइन ' मार्फत संबंधित मुलाची माहिती वाशिम जिल्हा बाल संरक्षण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांच्या मार्गदर...