सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत बालकांना शस्त्रक्रियेसाठी अमरावती येथे पाठविले


‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत बालकांना शस्त्रक्रियेसाठी अमरावती येथे पाठविले

वाशिम (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, पथक क्रमांक १, मानोरा यांच्या वतीने बालकांना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुपर स्पेशालिटी रुग्णालय, अमरावती येथे आयोजित शस्त्रक्रिया शिबिरासाठी रुग्णांना पाठविण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित उपस्थित होत्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक उपचार व शस्त्रक्रियांसाठी त्यांना पुढील आरोग्यसेवेशी जोडण्यात येत आहे.

बालकांना वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर