सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर हा जयंती दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून एकता दौडचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशीमच्या वतीने करण्यात आले आहे.
31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दौड सहभागी होण्याचे आवाहन वाशिम दि.28 (जिमाका) सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर हा जयंती दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसाचे औचित्य साधून वाशिम येथे जिल्हा क्रीडा संकुल येथून एकता दौडचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशीमच्या वतीने करण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता दौडच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात येईल.एकता दौड क्रीडा संकुल येथून बस स्टँडमार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,पाटणी चौक,अकोला नाका,जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गे डॉ. देशमुख हॉस्पिटल चौकातून जिल्हा क्रीडा संकुलात पोहचुन दौडचा समारोप होईल.एकता दौडमध्ये वाशिम शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातीलविद्यार्थी,युवक - युवती,विविध क्रीडा संघटना व नागरिकांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.