मतदार यादी निरीक्षकांची राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठक
मतदार यादी निरीक्षकांची राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठक वाशिम दि.३०(जिमाका) मतदार यादी निरीक्षक तथा अमरावती विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी आज ३० नोव्हेंबर रोजी नियोजन भवनातील सभागृहात राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्याम बढे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुधीर कवर,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानजोडे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे गट) जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.श्रीमती पाण्डेय म्हणाल्या,मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.त्यामध्ये मतदाराच्या नावाचा समावेश करायचा असेल किंवा नाव वगळायचे...