शेगांव येथे २ फेब्रुवारीला विभागीय रोजगार मेळावा
*शेगांव येथे २ फेब्रुवारीला विभागीय रोजगार मेळावा* वाशिम,दि.३१ (जिमाका) जिल्हयातील नोकरी/ रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात,या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय,अमरावती, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व श्री.संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय,शेगांव यांच्या संयुक्त वतीने २ फेब्रुवारी रोजी श्री.संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय,शेगांव येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागीय रोजगार मेळाव्यात पिपल ट्री व्हेन्चर्स प्रा.लि.अमरावती, जिनीअस इंन्फ्रा प्रा.लि.,धुत ट्रॉन्समिशन प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर,ए.जी.एस.इंशुरन्स, अमरावती,पियाजिओ व्हेवीकल्स प्रा. लि.,परम स्कील्स ट्रेनींग (इं) प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर,लक्ष्मी अग्णी कंपनी प्रा.लि.,जाधव ग्रुप ऑफ कंपनी,सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट सो. लि.,नवभारत फर्टीलायझर,टॅलेनसेतू प्रा.लि.,सी.ए.जी.एल.,कल्पतरु स्कील डेव्हलपमेंट अॅकेडमी, इलेगन्ट कोटींग प्रा.लि.,संत तेजस्वी फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रा. लि.,पी.एन.बी.मेटलाईफ इंडीया इंशुरन्स प्रा.लि.,पिय...