*कोविडचे डोज न घेतलेला रुग्ण ऑक्सिजनवर* पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन
*कोविडचे डोज न घेतलेला रुग्ण ऑक्सिजनवर* पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन वाशिम दि.३०( जिमाका) वाशिम येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालयात एकूण तीन रुग्ण भरती आहे. एका रुग्णाने कोविड लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या आहे. दुसऱ्या रुग्णाने कोविडची एक मात्र घेतली आहे. तिसऱ्या रुग्णाने तर कोविड लसीची एकही मात्रा घेतली नसल्यामुळे, त्याला भरती करते वेळी त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण ६० टक्के होते. हा रुग्ण अत्यवस्थ परिस्थितीत भरती झाला होता.या रुग्णाला सतत ऑक्सिजनची गरज पडत आहे. कोविड लस न घेतल्यामुळे रुग्णाची झालेली ही अवस्था बघता १५ वर्षावरील सर्व पात्र व्यक्तीने लसीकरण करावे. सध्या वाढत्या कोरोना व नव्या ओमीक्रोन विषाणूंचा संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे १०० टक्के लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. कोविड लसीकरण संपूर्ण सुरक्षित आहे. लसीकरणामुळे कोविड संसर्ग झाला तरी कोरोना आजार होण्याचे प्रमाण कमी आहे. जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गामुळे पहिल्या आणि दुसर्या लाटेत अ...