राज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, शेतकरी आणि पशुधनासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.


राज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, शेतकरी आणि पशुधनासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमध्ये चारा उपलब्धतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. नवीन कार्यपद्धतीनुसार सुका चारा १२ रुपये प्रतिकिलो, तर ओला चारा ८ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध केला जाणार असून, वन, महसूल आणि जलसंपदा विभागाच्या जमिनींवर जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून चारा लागवड होईल. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील अतिरिक्त चारा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांकडे वळवण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे.

#Drought #DroughtRelief #FarmersWelfare #Fodder #Livestock #RevenueDepartment #MaharashtraGovernment #दुष्काळ #दुष्काळनिवारण

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर