दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण कामांना गती देवून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा!जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर🔹 जलयुक्त शिवार अभियान २.० आढावा सभा


🚩 दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण कामांना गती देवून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा!

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

🔹 जलयुक्त शिवार अभियान २.० आढावा सभा

वाशिम, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) : एल-निनोचा संभाव्य प्रभाव आणि जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून जलस्रोतांचे बळकटीकरण आणि भूजल पुनर्भरणाच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात आज १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान २.० आढावा सभा संपन्न झाली.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, सहाय्यक वनसंरक्षक सुशील मंतावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरेंद्र वाघमारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह,उपविभागीय अधिकारी संतोष वाळके,लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रजत बिजवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संभाव्य पाणीटंचाईच्या दृष्टीने नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्यासह अपूर्ण कामांचे जिओ-टॅगिंग आणि कार्यपूर्तता प्रमाणपत्रे सादर करण्यावर जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील पाण्याचा ताळेबंद सकारात्मक आहे.आराखडयात समाविष्ट गावे सर्व १६६ गावे जलपरिपूर्ण झाली पाहिजेत. आराखड्यानुसार कामांची पुनर्रचना करून अनावश्यक कामे कमी करण्यात आली असून जिओ पोर्टलवर नोंदणी झालेली २ हजार ३८९ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांचे जिओ-टॅगिंग तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या.

💧 **भूजल पुनर्भरण आणि सिंचन कामांना प्राधान्य**

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापना अंतर्गत प्रलंबित कामे ऑक्टोबर अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून भूजल पुनर्भरणासाठी ऑक्टोबर महिन्यात रिचार्ज शाफ्टची कामे नियोजित करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ३.० अंतर्गत क्लस्टरचा अंतिम जीआयएस डेटा स्वाक्षरीसह सादर करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

🌱 गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार उपक्रमावर भर द्यावा

पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार उपक्रमांतर्गत निधी मागणीचे सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी सादर सादर करून कामांना गती द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले.

जल शक्ती जन भागीदारी आणि सीटीआर-२०२६ अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची संख्येत वाढ झाली असून १ जून २०२६ नंतरच्या नवीन कामांची जिओ पोर्टलवर नोंदणी जलदगतीने पूर्ण करावेत.संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि पूर्तता यामध्ये समन्वय राखून सर्व संबंधित यंत्रणांनी निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीला सर्व तहसीलदार,सर्व तालुका कृषी अधिकारी आदी व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.

#जलयुक्तशिवारअभियान #जलसंधारण #जलव्यवस्थापन #भूजलपुनर्भरण #जिल्हा_प्रशासन #वाशिम
#दुष्काळ

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर