पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करा !जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश📍 पाणीटंचाई आढावा सभा
💧पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करा !
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश
📍 पाणीटंचाई आढावा सभा
वाशिम, दि. १३ ऑक्टोबर (जिमाका) : ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजनबद्ध कार्यवाही करावी. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचा सर्वंकष आराखडा तयार करावा, तसेच प्रस्तावित कामे विहित मुदतीत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश कान्हेरकर आदी उपस्थित होते.
💧 **संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी विशेष नियोजन**
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेताना संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि प्रलंबित वीज जोडण्या पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. आवश्यकता असलेल्या गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे.
🛠️ **दीर्घकालीन उपाययोजनांवर भर**
संभाव्य पाणीटंचाईचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसोबतच वर्षभरासाठीही नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये विहिरींचे अधिग्रहण, नवीन बोअरवेल घेणे, नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, हातपंपांची दुरुस्ती तसेच विहिरींचे खोलीकरण आणि आडवे बोअर घेणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे. जलस्रोतांची उपलब्धता लक्षात घेऊन गावनिहाय आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
⚡ **पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा**
पाणीपुरवठा योजनांसाठी प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. ज्या गावांतील जलस्रोतांची पाणीपातळी कमी झाली आहे किंवा विद्यमान जलस्रोत अपयशी ठरले आहेत, तेथे पर्यायी विहिरी अथवा बोअरवेलची व्यवस्था करावी.
संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे पर्यायी स्रोत वेळेत आयडेंटीफाय करून ठेवावेत.असेही जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले.
या सभेला सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर आणि कैलास देवरे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
#वाशिम #पाणीटंचाई #पाणीपुरवठा #जलव्यवस्थापन #ग्रामीणविकास #जिल्हा_प्रशासन #दुष्काळनिवारण
Comments
Post a Comment