पीक कापणी प्रयोग अचूक व वस्तुस्थितीदर्शकपणे राबवा📢 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या क्षेत्रीय यंत्रणांना सूचना📍 इलखी येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोगाची प्रत्यक्ष पाहणी


🌱 पीक कापणी प्रयोग अचूक व वस्तुस्थितीदर्शकपणे राबवा

📢 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या क्षेत्रीय यंत्रणांना सूचना

📍 इलखी येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोगाची प्रत्यक्ष पाहणी

वाशिम, दि. ७ ऑक्टोबर (जिमाका) : पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणारी माहिती पिकांची उत्पादकता आणि प्रत्यक्ष परिस्थिती दर्शविणारी असल्याने या प्रक्रियेत अचूकता व पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रीय यंत्रणांनी निर्धारित पद्धतीनुसार पीक कापणी प्रयोग अत्यंत काळजीपूर्वक व वस्तुस्थितीदर्शकपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या.

वाशिम तालुक्यातील मौजे इलखी येथे आज घेण्यात आलेल्या सोयाबीन पीक कापणी प्रयोगाची जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रयोगाची कार्यपद्धती आणि क्षेत्रीय स्तरावर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली.

या वेळी तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, पर्यवेक्षक अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, कृषी अधिकारी गंगाधर इंगोले आणि सहाय्यक कृषी अधिकारी सुनील गोटे उपस्थित होते.

🌾 मौजे इलखी येथील प्रयोगात सोयाबीन पिकाचे वजन २ किलो ८०५ ग्रॅम आले.

प्रयोगाच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाहीची माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी अचूक नोंदणी, पारदर्शकता आणि निर्धारित कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.

#पीककापणीप्रयोग #सोयाबीन #कृषी #वाशिम #कृषीविभाग

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर