#सेवा_संकल्प_अभियान२०२६ 🩸 रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान द्या! ❤️जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांचे आवाहनराष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जनजागृती रॅली व रक्तदान शिबिर
#सेवा_संकल्प_अभियान२०२६
🩸 रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान द्या! ❤️
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांचे आवाहन
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त जनजागृती रॅली व रक्तदान शिबिर
वाशिम, दि. १ ऑक्टोबर : अपघातग्रस्त, शस्त्रक्रियाग्रस्त, गर्भवती माता तसेच सिकल सेल व थॅलेसेमिया रुग्णांसाठी वेळेवर रक्त उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. रक्ताला अद्याप कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांनी नियमित स्वैच्छिक रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले.
🩸 ‘रक्तदान करा – जीवनदान द्या’
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तकेंद्राच्या वतीने रक्तदानाचे महत्त्व आणि स्वैच्छिक रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले.
🚶♂️ जिल्हा सामान्य रुग्णालय ते जिल्हा क्रीडा संकुल या मार्गावर जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘रक्तदान करा – जीवनदान द्या’ या संदेशांद्वारे नागरिकांना नियमित रक्तदानाचे आवाहन करण्यात आले.
🤝 रॅलीनंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांनी उपस्थितांना रक्तदानाची शपथ दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी आणि जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. हरिदास मुंडे यांनी रक्त संकलन, रक्तघटकांचे विभाजन, तपासणी, साठवणूक आणि गरजू रुग्णांना रक्तपुरवठ्याबाबत मार्गदर्शन केले. रक्तकेंद्रांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध राहण्यासाठी वर्षभर नियमित रक्तदान शिबिरे आयोजित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय व शासकीय रक्तकेंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. रवि भिसे, दत्ता जगणे, अंकित, सुनील सावके, शिवशंकर गोडघासे, सचिन दांडे, नरेंद्र सांगळे आणि नर्स प्रियंका सावंत यांनी विशेष पुढाकार घेऊन घेतला.
❤️ तुमचे रक्तदान एखाद्या गरजू व्यक्तीसाठी जीवनाची आशा ठरू शकते.
#रक्तदान #रक्तदानकराजीवनदानद्या #राष्ट्रीयस्वैच्छिकरक्तदानदिन #सेवासंकल्पअभियान #सेवासंकल्पअभियान२०२६ #वाशिम #स्वैच्छिकरक्तदान #रक्तदानशिबिर #जीवनदान #BloodDonation #SaveLives
Comments
Post a Comment