#सेवासंकल्पअभियानांतर्गत 🌸 **आजी-आजोबांचा सन्मान करत विद्यार्थ्यांनी घेतली आदराची शपथ!** 🌸📍 **सवड, ता. रिसोड | सेवा संकल्प अभियान**
#सेवासंकल्पअभियानांतर्गत 🌸 **आजी-आजोबांचा सन्मान करत विद्यार्थ्यांनी घेतली आदराची शपथ!** 🌸
📍 **सवड, ता. रिसोड | सेवा संकल्प अभियान**
ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव, कृतज्ञता आणि संस्कारांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, सवड येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी *ज्येष्ठ नागरिक दिन* साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘आजी-आजोबा-शिक्षक-मुले’ बैठकीचे आयोजन करण्यात आले.
💐 कार्यक्रमात उपस्थित आजी-आजोबांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आजी-आजोबांशी आदराने आणि सन्मानपूर्वक वागण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
👨👩👧👦 सहाय्यक शिक्षिका श्रीमती इंगोले यांनी आजी-आजोबांचे कुटुंबातील महत्त्व, त्यांचा आधार आणि मुलांच्या जडणघडणीतील संस्कारांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. भगत यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
#सेवासंकल्पअभियान #ज्येष्ठनागरिकदिन #आजीआजोबा #संस्कार #विद्यार्थी #शासकीयनिवासीशाळा #सवड #रिसोड #वाशिम #जनजागृती
Comments
Post a Comment