सत्यशोधक विचारांचे प्रणेते, सामाजिक समतेचे अग्रदूत !
सत्यशोधक विचारांचे प्रणेते, सामाजिक समतेचे अग्रदूत !
भारतीय समाजव्यवस्थेतील अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष उभारणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचे महान शिल्पकार होते.
शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा विचार कृतीतून सिद्ध करत त्यांनी स्त्रीशिक्षण, बहुजन शिक्षण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर कार्य केले.त्यांनी समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित समाजनिर्मितीचा विचार समाजासमोर मांडला.
त्यांचे विचार केवळ एका काळापुरते मर्यादित नसून आजही सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेच्या वाटचालीला दिशादर्शक आहेत.
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या परिवर्तनवादी विचारांना विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार आत्मसात करूया, समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध होऊया!
#महात्मा_जोतीराव_फुले #द्विजन्मशताब्दी_वर्ष #सामाजिक_समता #सत्यशोधक_विचार #शिक्षण #समाजप्रबोधन
Comments
Post a Comment