महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी २३० कोटी रुपयांच्या विकास प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.



महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी २३० कोटी रुपयांच्या विकास प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनुसार या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत फुलेवाडा परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच आवश्यक जमीन संपादन करून संपूर्ण परिसराचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

या बैठकीत महात्मा फुले यांच्या जयंती वर्षानिमित्त बहुजन आणि इतर मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी अनेक धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आले. ऐतिहासिक भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेचे स्मारक उभारणीचे काम येत्या तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. यासोबतच महसूल, पाणीपुरवठा आणि वनविभागासह दुष्काळ निवारणावर काम करणाऱ्या ११ प्रमुख विभागांच्या सर्व कल्याणकारी उपाययोजना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय लवकरच निर्गमित केले जाणार आहेत.

#MahatmaPhule #Phulewada #SavitribaiPhule #BhideWada #BahujanWelfare #OBCWelfare #RevenueDepartment #MaharashtraGovernment #MaharashtraNews

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर