माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतले पोहरादेवी येथे दर्शन बणजारा विरासत नंगारा भवनाची पाहणी मंत्री ना.संजय राठोड यांची उपस्थिती



माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतले पोहरादेवी येथे दर्शन

बणजारा विरासत नंगारा भवनाची पाहणी

मंत्री ना.संजय राठोड यांची उपस्थिती

वाशिम, दि. ३१ ऑक्टोबर (जिमाका): भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज पोहरादेवी येथे भेट देऊन जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतले. तसेच रामराव महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बणजारा विरासत (नंगारा भवन) वास्तुसंग्रहालयाची पाहणी केली.

या भेटीदरम्यान मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किल्लोर, न्यायमूर्ती पी.एस. पाटील , न्यायमूर्ती आर.डी.वाकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तत्पूर्वी, वाईगौळ येथील हेलिपॅडवर मंत्री ना. राठोड यांनी माजी सरन्यायाधीश श्री .गवई यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहाण, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर