३ मार्च रोजी १ लक्ष २८ हजार बालकांना मिळणार 'दो बूंद जिंदकी के' र ाष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
३ मार्च रोजी १ लक्ष २८ हजार बालकांना मिळणार 'दो बूंद जिंदकी के' राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम वाशिम, (जिमाका) संपुर्ण राज्यात दि.०३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १ टप्पा राबविण्यात येणार आहे. ०-५ वर्षाखालील बालकाचे लसीकरण करावयाचे आहे तसेच त्यानंतर दि. ०५ मार्च २०२४ पासुन बुथवरील ज्या बालकाचे लसीकरण झाले नाही अशा बालकांकरीता ग्रामिण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस घरोघरी जावुन जावुन सर्व्हेक्षण करून लसीकरण करण्यात येणार आहे. सदर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेतंर्गत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वय समितीची सभा दि. ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आली व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येवून संबधित यंत्रणेने सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत . दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थेच्या वैद्यकिय अधिकारी याचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. त्यामध्य...