घरकुलाच्या लाभार्थ्यांनी आमिषाला बळी पडू नये *जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे आवाहन
*घरकुलाच्या लाभार्थ्यांनी आमिषाला बळी पडू नये* जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे आवाहन वाशिम दि.२६(जिमाका)जिल्ह्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या विविध घटकातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळवून देण्याचे काम पंतप्रधान आवास योजना,रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे,केवळ त्यांनाच पासबुक व जॉब कार्डची झेरॉक्स प्रत, जागेचा आठ -अ ,100 रुपयांचा बॉण्ड पेपर आदी कागदपत्रांची मागणी पंचायत समितीकडून संबंधित गावच्या ग्रामसेवकाला करण्यात येत आहे. त्यामुळे घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. घरकुल लवकर मंजूर करून देतो असे कोणी सांगून पैशाची मागणी करीत असतील तर आर्थिक व्यवहार करू नये.तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.याबाबत संबधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना तातडीने कळवावे.असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील निकम यांनी केले आहे. सन २०१८ मध्ये विविध घटकातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेच...