लसीकरण वेगाने करण्यासोबतच यंत्रणा सतर्क असावी - पालकमंत्री शंभुराज देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे ओमॉक्रॉन संसर्ग टाळण्याच्या पूर्वतयारीचा आढावा
लसीकरण वेगाने करण्यासोबतच यंत्रणा सतर्क असावी - पालकमंत्री शंभुराज देसाई व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे ओमॉक्रॉन संसर्ग टाळण्याच्या पूर्वतयारीचा आढावा वाशिम दि. 30 (जिमाका) : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी ओमॉक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता सर्वच पात्र व्यक्तींचे लसीकरण वेगाने पुर्ण करण्यात यावे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सतर्क असावी असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. आज 30 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री श्री. देसाई यांनी ओमॉक्रॉनचा विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने पुर्व तयारीचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्री. देसाई म्हणाले, जिल्हयात कोविड ...