पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करा पालकमंत्री शंभूराज देसाई
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiy4Y7Zjlik_0IM_5RZw6tV5TIuzdvZYO-BVsGsC-Ungv-TBCDVgDXVEUDyzTgk9_wTSmJN_gcYTfSqO8eMsiB35pv39shkRbQwzLT72asbVCHO26zEg_RsSKEVSp4ylXlj4w57UHLovdk/s1600/1651336194080664-0.png)
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करा पालकमंत्री शंभूराज देसाई पाणीटंचाई व जल जीवन मिशनचा आढावा वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हयातील ज्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्या गावातील नागरीकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आज 30 एप्रिल रोजी पाणीटंचाई व जल जीवन मिशनचा आढावा घेतांना श्री. देसाई बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम, जि.प.उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे,जि.प अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी व म...